पाच दिवसात अँटिजेंन टेस्टमध्ये आढळले 135 कोरोना पॉझिटिव्ह
बीड- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच जिल्हा प्रशासनाने बीड जिल्ह्यातील सर्वच व्यापाऱ्यांची दुकानदारांची अँटी जेन टेस्ट करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार बीड शहरात चार ठिकाणी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये पाच दिवसात 135 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच जिल्हा प्रशासनाने कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्यातील व्यापारी दुकानदार फळविक्रेते अशा सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यवसायिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे ही चाचणी न केल्यास संबंधित दुकानदारास आपला व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी या चाचण्या सुरू आहेत
बीड शहरात राजस्थानी विद्यालय,चंपावती प्राथमिक विद्यालय, जिल्हा रुग्णालय आणि अशोक नगर येथील प्राथमिक विद्यालयात दिनांक 10 मार्च रोजी 495 चाचण्या घेण्यात आल्या त्यात नऊ कोरोना पॉझिटिव्ह आढळले, दिनांक 11 रोजी 597 चाचण्या घेतल्या त्यात 11 रुग्ण आढळले दिनांक 12 मार्च रोजी 610 चाचण्या घेण्यात आल्या त्यात 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, 13 मार्चला 898 चाचण्या घेण्यात आल्या त्यात 37 रुग्ण आढळले, 14 मार्च रोजी 649 चाचण्या घेतल्या त्यात 29 पॉझिटिव्ह आढळले तर दिनांक 15 मार्च रोजी 744 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या यामध्ये 24 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत बीड शहरात 3993 चाचण्या मध्ये 135 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे