रूग्ण संख्या कमी होताच बंधने हटवली जातील जिल्हाधिकाऱ्यांचे अनिल जगताप यांना आश्वासन
बीड : बीड जिल्ह्य़ात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यावसायिक बंधने घातली, व्यापाऱ्यांकडून या बंधनाचा निषेध होत होता, या संदर्भात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी आज जिल्हाधिकारी रविंद्रजी जगताप यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. रूग्ण संख्या कमी होताच बंधने हटवली जातील असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
व्यावसायिक, मजुर व हातावर पोट असणाऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आली. मागच्या महिन्यात कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव रूग्ण संख्या वाढवत आहे. याच कारणावरून जिल्हप्रशासनास अंशतः बंधने घालावी लागली. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे ही या विषयी गंभीर आहेत. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे हाच एकमेव पर्याय असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. रूग्ण संख्येचा वाढता आलेख कमी झाला तर बंधने शिथील होतील असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी शिवसेनेचे मा तालुकाप्रमुख उल्हास गिराम, युवासेनेचे मा जिल्हाप्रमुख अभिजीत बरीदे, पंकज कुटे, मुकेश शेवगण, चंद्रशेखर कवडे, आप्पासाहेब शेळके, चंद्रसेन काळे आदि उपस्थित होते