बीडमध्ये शतकी आकडा पार :जिल्ह्यात आज 248 कोरोना पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 15 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2483 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 248 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2235 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 50 आष्टी 9 बीड 115 धारूर 4 गेवराई 15 केज 11 माजलगाव 27 परळी 6 पाटोदा 5 शिरूर 3 वडवणी 3
मुंबई : दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात आज 16 हजार 620 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज नवीन 8 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 21 लाख 34 हजार 072 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 126231 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% वर पोहोचलं आहे.
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या एक कोटी १३ लाख ५९ हजार ४८ इतकी झाली आहे.
कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार, रविवारी देशात २५ हजार ३२० कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत
तर गेल्या २४ तासांस १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत देशात १६ हजार ६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी वाढलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे एकूण रुग्णांची संख्या एक कोटी १३ लाख ५९ हजार ४८ इतकी झाली आहे.
आतापर्यंत एक कोटी ९ लाख८९ हजार ८९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या दोन लाख १० हजार ५४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एक लाख ५८ हजार ६०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ८ लाख ६४ हजार ३६८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.