बीड

नियमांचा भंग केल्यास तात्काळ कारवाई करा-उपायुक्त सुरेश बेदमुथा

बीड-मंगल कार्यालये, सभागृहे, चहा टपऱ्या, क्लासेस, गर्दी होणारी बस, वाहने आदी ठिकाणी नियम भंग होत असेल तर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त(विकास आस्थापना)सुरेश बेदमुथा यांनी दिले आहेत

कोरोनाबाबत जिल्ह्यातील नागरिकात सतर्कता वाढण्यासाठी प्रशासनाने आखलेल्या उपायोजना तात्काळ राबविण्यात याव्यात. दुकानदार, व्यावसायिक, जनतेच्या जास्त संपर्कात असलेले सुपर स्प्रेडर यांना कोरोना तपासणी करून नंतर व्यवसाय-दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जावी. यासाठी कोरोना तपासणीची मोहीम राबवावी. मंगल कार्यालये, सभागृहे, चहा टपऱ्या, क्लासेस, गर्दी होणारी बस, वाहने आदी ठिकाणी नियम भंग होत असेल तर कारवाई केली जावी. याचबरोबर तालुकास्तरावरील यंत्रणेने देखील सक्षमपणे कार्यवाही करावी.

कोरोना साथ वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. यादृष्टीने लसीकरण प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन ती यशस्वी केली जावी. ज्या कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत त्यांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे. यासाठी संबंधित कार्यालय प्रमुखानी याबाबत आढावा घेवून जे कर्मचारी लसीकरण करुन घेतले नाहीत त्यांना तात्काळ लसीकरण करुन घेण्याबाबत सूचित करावे. असे सांगून जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही साथ आटोक्यात येण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावे तसेच लोकसंख्याच्या प्रमाणात कोरोना तपासण्या झाल्या पाहिजेत. सर्व संबंधित विभागाच्या समावेश असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची पथकाची स्थापन करुन त्यांच्या मार्फत कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश उपायुक्त बेदमुथा यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कोरोना उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार,निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते, प्र.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट, डॉ बाबासाहेब ढाकणे, जिल्हा लसीकरण अधिाकारी डॉ. संजय कदम तसेच जिल्ह्यातील तहसीलदार,नगर पालीका मुख्याधिकारी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.