बीडचा आकडा पन्नाशी पार तर जिल्ह्यात आज 110 कोरोना पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 10 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1063 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 110 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 953 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 10 आष्टी 11 बीड 57 धारूर 1 गेवराई 5 केज 4 माजलगाव 13 परळी 4 पाटोदा 2 शिरूर 1 वडवणी 2
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचं संकट अधिक गहिरं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशात कोरोना रुग्ण सापडलेल्या घटनेला मंगळवारी बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत
राज्यातील मंगळवारी दिवसभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर राज्यात गेल्या 24 तासांत 9 हजार 927 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तर 12 हजार 182 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात एकूण 95 हजार 322 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 93.34 टक्कांवर पोहोचलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.