बीड

श्रीक्षेत्र चाकरवाडी येथील महाशिवरात्रि महोत्सव कार्यक्रम रद्द

कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावमुळे देवस्थानचा निर्णय

बीड – दि-9 हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र चाकरवाडी येथील ज्ञानेश्वर माऊली समाधी स्थळावर होणारा यावर्षीचा महाशिवरात्री महोत्सव रद्द करण्यात आला आहे ..कोरोना च्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमाचे पालन करत शिवरात्री महोत्सव रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती देवस्थानचे सर्वेसर्वाश्री ह भ प महादेव महाराज (तात्या) यांनी दिली

श्री क्षेत्र चाकरवाडी येथे दिनांक 11 /3 /2021 रोजी गुरुवार ते 13/ 3/ 2021 रोजी शनिवार या दिवसांमध्ये महाशिवरात्री महोत्सव आहे.परंतु सध्या देशामध्ये कोरोनाचे संकट वाढत असल्यामुळे महाशिवरात्री महोत्सव शासनाच्या आदेशाचे पालन करून बंद ठेवण्याचे सर्वानुमते ठरले आहे. तरी या तीन दिवस मंदिर बंद राहणार आहे. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन ह.भ.प.महादेव महाराज (तात्या) व बाळनाथ माऊली संस्थान श्री क्षेत्र चाकरवाडी यांच्या वतीने करण्यात आली आहे