बीडचा आकडा चाळीशी पार तर जिल्ह्यात आज 93 कोरोना पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 9 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 790 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 93 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 697 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 22 आष्टी 2 बीड 43 धारूर 1 गेवराई 5 केज 4 माजलगाव 11 परळी 1 पाटोदा 2 शिरूर 2
मुंबई : राज्यात आज नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात सलग तीन दिवस दहा हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आज ही संख्या 8744 एवढी आहे. तर आज 9068 जण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21% झालं आहे. दरम्यान मागील 24 तासात 22 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत 52 हजार 500 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 लाख 28 हजार 471 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 20 लाख 77 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात एकूण 97 हजार 637 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.