महाशिवरात्रीचा फराळ खरेदी विक्री करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी
बीड- येत्या 11 मार्च रोजी महाशिवरात्रीचा दिवस असून या निमित्त भाविक भक्तांना उपवास करत असतात आठवडी बाजार बंद करण्यात आल्यामुळे भाविकांना उपवासाचे आवश्यक फराळ खरेदी करणे अवघड झाले आहे त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आता महाशिवरात्रीचा फराळ खरेदी करण्यासाठी दहा ठिकाणी दहा व्यक्तींना महाशिवरात्रीच्या निमित्ताने आवश्यक असणारे फराळाचे सामान विक्री करण्यास परवानगी दिली आहे
तालुक्याच्या ठिकाणी व तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी गावात दहा ठिकाणी एका जागेवर केवळ दहा व्यक्तींना महाशिवरात्रीच्या निमित्ताने आवश्यक असणारे फराळाचे सामान विक्री करण्यास ठिकाण ठरवून देऊन विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी प्रत्येक फराळ विक्रेत्यांमध्ये 10 फुटाचे अंतर असणे बंधनकारक आहे सदरील परवानगी कोविडचे सर्व नियम पाळण्याच्या अटीवर देण्यात यावी विक्रेता covid-19 बाबतचे मार्गदर्शक तत्त्व मास्क सॅनिटायझर स्वच्छता सोशल डिस्टंसिंग इत्यादी नियमांचा भंग करेल अशा विरुद्ध दंडात्मक कारवाई करावी अन्यथा सूचनांचे उल्लंघन करील अशा व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत