बीड

कोरोनाटेस्ट न करता दुकान उघडल्यास व्यापाऱ्यांवर होणार कारवाई

बीड- जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी येत्या 15 मार्च पर्यंत अँटीजेन टेस्ट करून घ्यावी अन्यथा दुकान उघडता येणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहे

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यानुसार ज्या व्यक्तींचा दररोज मोठ्या प्रमाणावर लोकांचा संपर्क येत असतो अशा सर्व व्यक्तींची अँटिजेंन टेस्ट करणे आवश्यक आहे याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत बीड जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी त्याची अँटिजेंन टेस्ट केल्या शिवाय आपली दुकाने चालू करता येणार नाहीत असे आदेशित केले आहे अँटिजेंन टेस्ट जिल्ह्यातील सर्व व्यापारी यांनी दिनांक 15 मार्च 2021 पर्यंत करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे जो व्यापारी अँटिजेंन टेस्ट न करता आपले दुकान चालू करील अशा व्यापाऱ्यावर संबंधित तहसीलदार/ मुख्याधिकारी/ गटविकास अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्था यांचे अधिकारी अथवा कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 (45) कलम 188 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे