बीड

बीडचा आकडा चाळीशीत तर जिल्ह्यात आज 89 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 8 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 855 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 89 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 766 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 11 आष्टी 11 बीड 40 गेवराई 5 केज 3 माजलगाव 9 परळी 7 शिरूर 3

राज्यात 11हजार 141पॉझिटिव्ह

मुंबई, 7 मार्च : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या काही कमी होताना दिसत नाही. राज्यात आज तर कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या समोर आली आहे. राज्यभरात दि 7 रोजी तब्बल 11 हजार 141 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही वाढती रुग्णसंख्या शासन आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

राज्यात 38 करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मतृयदूर 2.36 टक्के एवढा आहे. दुसरीकडे, राज्यात आज 6 हजार 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.17 टक्के एवढे आहे.