कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! होळी अगोदर मिळणार महागाई भत्ता;होणार लवकरच घोषणा ?
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून एक गुड न्यूज देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या 52 लाख कर्मचारी आणि 60 लाख निवृत्ती वेतनधारकांना होळीपूर्वी महागाई भत्त्याबद्दल खूशखबर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. होळी होण्यापूर्वी सरकार त्याची घोषणा करण्याची शक्यता काही माध्यमांच्या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. या कर्मचार्यांचे आणि पेन्शनधारकांचे महागाई भत्ता जानेवारी 2021 पासून प्रलंबित आहे.
नोकरीमध्ये असलेल्यांना महागाई भत्ता मिळतो आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाईपासून मुक्ततेसाठी महागाई सवलत मिळते. होळी होण्यापूर्वी सरकार जुन्या पातळीवर महागाई भत्ता आणेल अशी त्यांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनामुळे केंद्र सरकारने महागाई भत्ता त्वरीत थांबविला होता. जुलै 2021 पर्यंत हा भत्ता थांबविण्यात आला आहे. असा विश्वास आहे की होळी होण्यापूर्वी याची पुन्हा स्थापना करण्याची घोषणा केली जाईल.
सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता 17 टक्के आहे. अशा परिस्थितीत ही घोषणा झाल्यास महागाई भत्ता 21 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षीचा प्रलंबित चार टक्के भत्त्याचीही घोषणा केली जाऊ शकते. तसे झाल्यास भत्ता 25 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. सरकारने महागाई भत्त्याची घोषणा केल्यास सरकारी तिजोरीवर 12510 कोटींचा भार आणि महागाई सवलतीसाठी 14595 कोटी इतका होईल. याचा फायदा 52 लाख कर्मचारी व 60 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.
केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता देते. डीए वाढविण्याचा शेवटचा प्रस्ताव जानेवारी 2020 मध्ये करण्यात आला होता आणि मार्च 2020 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली होती. त्यानुसार 4 टक्के महागाई भत्ता वाढणार आहे. जुलै 2020 मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता बंद केला होता, त्यामुळे महागाई भत्ता सुरु झाल्यानंतर थकबाकी मिळण्याची आशा केंद्रीय कर्मचार्यांना आहे. सुमारे 52 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 62 लाख निवृत्तीवेतनधारकांना हा होळीचा मोठा बोनस असेल. तथापि, केंद्र सरकारने या संदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. केंद्र सरकारने यापूर्वी जून 2021 पर्यंत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए आणि डीआर थांबविण्याची घोषणा केली होती.