बीड जिल्ह्यात जमावबंदी: आठवडी बाजार कोचिंग क्लासेस 31 मार्च पर्यंत बंद
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले कडक नियमांचे आदेश
बीड
बीड जिल्ह्यात कोरोनाविषाणू चा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कडक नियमावली आदेश जारी केले असून यामध्ये जिल्ह्यात सर्व यात्रा आठवडी बाजार आणि कोचिंग क्लासेस 31 मार्च पर्यंत कोणाचा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत मात्र यामध्ये इयत्ता दहावी बारावीचे वर्ग वगळून कोचिंग क्लासेस बंद राहतील असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे
बीड जिल्ह्यात 31 मार्च पर्यंत घर अलगीकरण करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींच्या हातावर होऊन कारण त्यांची शिक्के मारावेत सदर व्यक्ती घर अलगीकरण कालावधीत घरीच राहतो की नाही याबाबत तपासणी करण्यात यावी अलगीकरण कालावधीत बाहेर आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे सार्वजनिक स्वरूपाची संमेलन मेळावे प्रतिबंधित राहतील जिल्ह्यात सर्व खाजगी कोचिंग क्लासेस दिनांक 31 मार्चपर्यंत पूर्णतः बंद राहतील मात्र यात इयत्ता दहावी आणि बारावीचे कोचिंग वर्ग चालू राहतील जिल्ह्यातील सर्व यात्रा आठवडी बाजार हे देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवावेत असे आदेश देण्यात आले आहेत सर्व प्रकारच्या राजकीय कार्यक्रम मोर्चे निदर्शने आंदोलने उपोषण covid-19 च्या काळात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास 31 मार्च च्या मध्यरात्रीपर्यंत मनाई करण्यात आली आहे
हात गाडी वरील भाजी फळ वस्तू विक्रेते यांना सोशल डिस्टंसिंग मास्कचा वापर करूनच वस्तू विकण्यास परवानगी देण्यात यावी नागरिकांनी covid-19 बाबतचे मार्गदर्शक तत्वे सक्तीने पाळावेत व मास्क सॅनिटायझर स्वच्छता सोशल डिस्टंसिंग इत्यादींचे काटेकोरपणे पालन करावे सदरील नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांविरुद्ध स्थानिक प्रशासन नगर परिषद नगरपंचायत संबंधित विभागाने या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक सहा चे आदेशाप्रमाणे दंडात्मक कारवाई करावी covid-19 संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवा अनधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक्स किंवा सोशल मीडिया इत्यादींच्या माध्यमातून पसरवण्यात येऊ नये असे आढळल्यास संबंधित विरुद्ध फौजदारी कारवाई दाखल करण्यात यावी या सूचनांचे पालन न केल्यास सदरील व्यक्तींविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 नुसार कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आदेशात म्हटले आहे