बीड

बीड जिल्ह्यात आज आढळले 49 कोरोना पॉझिटिव्ह:रोज पन्नाशी संख्या चालू

बीड जिल्ह्यात आज दि 2 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1008जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 49 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 959 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 11 आष्टी 2 बीड 18 धारूर 1 गेवराई 3 केज 6 माजलगाव 6 परळी 2

राज्यात काल दिवसभरात 6 हजार 397 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 30 रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 5 हजार 754 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 93.94 टक्के झाला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21 लाख 61 हजार 467 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 30 हजार 458 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 5 हजार 754 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात काल 6397 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5754 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
एकूण 2030458 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 77618 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.94% झाले