कोरोना गाइडलाइन्सची मर्यादा 31 मार्चपर्यंत वाढवण्याचे केंद्राचे आदेश
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राने कोरोना गाइडलाइन्सची मर्यादा 31 मार्चपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले. तसेच कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासही सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे.
केंद्र सरकारनं कोरोनाचे नवे गाइडलाइन्स 27 जानेवारीपासून लागू केले होते. कोरोना परिस्थितीवर लक्ष, कंटेनमेन्ट आणि खबरदारीबाबत आधी लागू असलेल्या या गाइडलाइन्सचं 31 मार्चपर्यंत पालन करावं, असे आदेश आहेत.कंटेन्मेंट झोनमध्ये आवश्यक खबरदारी घ्या, प्रसंगी कठोर पावलं उचण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
देशातील सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दररोज 8 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा खुलासा केला आहे.राज्यात कोरोना फोफावत असला तरी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर होणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. संपूर्ण लॉकडाउन नसला, तरी नागरिकांनी निर्बंध पाळावेत, मास्कचा नियम पाळावा यासाठी कडक धोरण अवलंबण्यात येणार आहे.
27 जानेवारी, 2021 ला केंद्र सरकारनं कोरोनाचे नवे गाइडलाइन्स लागू केले होते.
कोरोना परिस्थितीवर लक्ष, कंटेनमेन्ट आणि खबरदारीबाबत आधी लागू असलेल्या या गाइडलाइन्सचं 31 मार्चपर्यंत पालन करावं, असे आदेश देण्यात आले आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये आवश्यक ती खबरदारी घ्या, कठोर पावलं उचण्याच्या सूचनाही केल्या आहेत.