बीड

बीड जिल्ह्यात आज आढळले 51 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 26 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 872 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 51 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 829 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 9 बीड 22 आष्टी 5 गेवराई 1 केज 4 माजलगाव 4 परळी 2 पाटोदा 1 शिरूर 3

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात तब्बल 8 हजार 702 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 64 हजार 260 वर पोहोचली आगहे. आतापर्यंत राज्यातील एकूण 21 लाख 29 हजार 821 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 20 लाख 12 हजार 367 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 3 हजार 744 रुग्ण बरे झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 94.49 टक्क्यांवर पोहोचले आहे.

error: Content is protected !!