कोरोना नियमांचे पालन करण्याचे आयसीएमआरचे आवाहन
नवी दिल्ली : देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत चालला आहे. रोज नवे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सने खबरदारीचा उपाय म्हणून काही आरोग्यविषयक टिप्सचे पालन करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
१ किमान दोन वर्षे परदेशी प्रवास करू नका
२ एक वर्षासाठी बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ नका.
३ विवाह किंवा समारंभात जाऊ नका.
४ अनावश्यक प्रवास करू नका.
५ एक वर्षासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
६ सामाजिक अंतरांच्या नियमांचे पालन करा.
७ खोकला असलेल्या व्यक्तीपासून दूर रहा.
८ घराबाहेर पडतांस चेहऱ्यावर मास्क घाला.
९ सध्या एका आठवड्यासाठी खूप काळजी घ्या.
१० तुमच्या अवतीभवती गडबड होऊ देऊ नका.
११ शाकाहारी अन्नास प्राधान्य द्या.
१२ आता किमान 6 महिने सिनेमा, मॉल, गर्दीने भरलेल्या बाजारात जाऊ नका. पार्क, पार्टीला जाणेही आवर्जून टाळा.
१३ रोग प्रतिकारशक्ती वाढवा.
१४ सलून किंवा ब्युटीपार्लरमध्ये खूप काळजी घ्या.
१५ अनावश्यक सभा टाळा, सामाजिक अंतर ठेवा.
१६ कोरोनाचा धोका लवकरच संपणार नाही.
१७ घराबाहेर जाताना बेल्ट, अंगठी, मनगटी घड्याळ घालू नका. मोबाइलला गरजेपुरता वापरा.
१८ हात स्वच्छ साबणाने धुवा, सॅनिटायझर वापरा.
१९ घरात बूट आणू नका. त्यांना बाहेर सोडा.
२० बाहेरून घरी आल्यावर हात व पाय स्वच्छ करा.