बीड जिल्ह्यात आज आढळले 47 कोरोना पॉझिटिव्ह तर बरे झाले 16
बीड जिल्ह्यात आज दि 23 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 603 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 47 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 556 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आज 16 रुणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 12 आष्टी 1 बीड 23 धारूर 2 गेवराई 3 केज 3 परळी 2 वडवणी 1
राज्यात आज दिवसभरात ५२१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 18 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २.४६ टक्के इतका झाला असून दिवसभरात ५०३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या ५३१३ वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात काल ६९७१ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली होती. कालच्या तुलनेत आज नव्या रुग्णांमध्ये घट झाल्याने काहीसे दिलासादायक वृत्त समोर येत आहे. मात्र, संकट कायम असून नागरिकांनी काटेकोरपणे नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनातर्फे केलं जात आहे.
देशात कोरोनाने पुन्हा एकदा पाय पसरण्यास सुरवात केली आहे. सलग पाचव्या दिवशी देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. गेल्या 24 तासांत, कोरोनाचे 14,199 नवीन रुग्ण आढळले आहेत. आणि त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1.10 कोटीच्या पुढे गेली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासात 83 जणांना कोरोनाच्या विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आणि देशातील एकूण मृत्यूची संख्या 1,56,385 वर पोहोचली आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या संसर्गाची वाढ लक्षात घेता पुन्हा एकदा प्रशासनाने कठोर निर्बंध लावण्यास सुरवात केली आहे.