ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

नियम न पाळल्यास 8 दिवसात लॉकडाऊनचा निर्णय-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील सर्व राजकीय,धार्मिक सामाजिक कार्यक्रम बंद

महाराष्ट्रात कोरोनाची लाट आलीय की नाही हे 8-15 दिवसांत कळेल, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“जर यावेळी काळजी घेतली नाही तर लॉकडाऊन पुन्हाला लावावा लागेल आणि यावेळी (अंमलबजावणी) अवघड असेल,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला आहे.

लॉकडाऊनबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “लॉकडाऊन करावा का? मी तुम्हाला विचारतोय. याचं उत्तर मी पुढचे 8 दिवस घेणार आहे.

ज्यांना लॉकडाऊन हवा ते विना मास्क फिरतील. त्यामुळे सूचना पाळा आणि लॉकडाऊन टाळा.”

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येतेय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे :

पुढच्या महिन्यात कोरोना येऊन एक वर्ष होईल
जनतेशी आपल्यावर विश्वास असण्याला नशीब लागतं
दिलासादायक गोष्ट म्हणजे लस आपल्या हातात आहे
9 लाखांच्या आसपास आपण कोव्हिडयोद्ध्यांना लस द्यायला सुरुवात केलीय
लशीमुळे कोणतेही घातक साईडइफेक्ट्स आढळले नाहीत
सर्वसामान्य लोकांना लस कधी मिळणार, हे केंद्र सरकार ठरवतोय
कोव्हिडयोद्ध्यांनो, आपण सैनिक आहात, तुम्ही बेधडकपणे जाऊन लस घेऊन या
कोरोनासोबत आपण युद्ध लढतोय, पण हे युद्ध लढताना औषधरुपी तलवार आली नाहीय, त्यामुळे मास्करुपी ढाल आपल्याकडे हवी
लस घेण्याआधी आणि नंतरही मास्क घालणं हे अनिवार्य आहे
पूर्वी महाराष्ट्रात 2 टेस्टिंग लॅब होत्या. आता 500च्या वर आहेत
राज्यात पुन्हा कोरोना डोकं वर काढतोय. राज्यात लाट आलीये की नाही हे 8-15 दिवसांत कळेल.
आपल्याला वाटलं कोरोना गेला. मास्क लावणाऱ्यांना मूर्ख म्हटलं गेलं. कोरोनाची लाट वर जाते, खाली येते. ती खाली येते, तेव्हा तिला थांबवायचं असतं.
पाश्चिमात्य देशांमध्ये आता पुन्हा लॉकडाऊन आहे.
कोरोनाची स्थिती पाहून मंत्री नितीन राऊत यांनी मुलाचा लग्न सोहळा रद्द केला
लग्नाच्या हॉलमध्ये नियम मोडले तर कारवाई होणार
सगळ्या गोष्टी आपल्याला सुरू पाहिजेत, पण त्या सुरू करताना शिस्तीची गरज आहे
अर्थचक्राला गती देत असताना पुन्हा कोरोनाचं संकट आलं
कोव्हिड योद्धे झाला नाहीत तरी कोव्हिड दूत होऊ नका
अमरावतीत आज हजाराच्या आसपास रुग्ण सापडले असतील, ही परिस्थिती वाईट आहे
40 हजारापर्यंत रुग्णसंख्या खाली आली होती, ती आता 53 हजार झालीय
हात जोडून विनंती. पुन्हा बंधन पाळावी लागतील
सर्व राजकीय पक्षांना विनंती की, आपण आपल्यापासून सुरुवात करुया. उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक, सामिजक कार्यक्रम, गर्दी करणारी आंदोलनं यांना काही दिवस बंदी आणत आहोत
सगळ्यांना पक्ष वाढवायचं आहे, पण आपल्याला पक्ष वाढवूया, कोरोना वाढवायचा नाहीय
मास्क घाला आणि लॉकडाऊन टाळा, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा
कोरोनाचा पुन्हा वाढत चाललेला प्रभाव रोखण्यासाठी काही उपाययोजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतात का, जनतेला ते काय आवाहन करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

याआधी गेल्यावर्षी कोरोनाच्या साथीची सुरुवात झाली होती, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशाचप्रकारे नियमितपणे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधून, जनतेला कोरोनाबाबत माहिती देत असत आणि आवाहन करत असत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच, अकोला-अमरावती भागात पुन्हा रुग्णांचं प्रमाण वाढू लागल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.