बीड जिल्ह्यात बरे झालेल्या पेक्षा आज दुप्पट आढळले कोरोना पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 21 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 419 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 53 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 366 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आज 27 रुग्ण बरे झाले आहेत जिल्ह्यात 18416 बाधीत संख्या पोहचली असून 17545 रुग्ण बरे झाले आहेत जिल्ह्यात 573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 268 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 19 आष्टी 1 बीड 16 धारूर 1 गेवराई 1 केज 3 परळी 5 पाटोदा 1 शिरूर 6
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (State Corona Count increased) डोकं वर केलं आहे. राज्यात 6 हजार 281 नवे कोरोना रूग्ण आढळले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकट्या मुंबईत 897 बाधित रुग्ण सापडले आहेत. दिवसागणिक रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे चिंता वाढली आहे.
राज्यात कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. राज्यात ६ हजार २८१ नवे कोरोना रूग्ण तर कोरोनामुळं ४० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे ४८ हजार ४३९ ऍक्टिव्ह रूग्ण आहेत.
नवी दिल्ली – देशांत गेल्या 24 तासांत 13 हजार 993 जणांना बाधा झाली. तर करोनाशी संबंधित आजाराने 101 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले. सुमारे 23 दिवसांनी करोना बाधितांनी 14 हजाराचा टप्पा गाठला आहे.
यापुर्वी 29 जानेवारीला 18 हजार 885 बाधितांची नोंद करण्यात आली. देशातील सक्रिय बाधितांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी अधिक होती. सक्रिय बाधितांची संख्या शुक्रवारी एक लाख 39 हजार 542 होती, ती शनिवारी एक लाख 43 हजार 127 वर जाऊन पोहोचली. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण 1.27 टक्के आहे.