राज्यात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा घट्ट:बीड जिल्ह्यात 58 पॉझिटिव्ह
दररोज नोंद होणा-या रूग्णांमध्ये कामालीची वाढ होत असून,काल दिवसभरात राज्यात 6 हजार 112 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 44 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 87 हजार 632 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 89 हजार 963 जण कोरोनामुक्त झाले आहेत.शुक्रवारी दिवसभरात 2 हजार 159 बरे झालेल्या डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 95.32 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या 44 हजार 765 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काल दिवसभरात राज्यात 44 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 51 हजार 713 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.48 टक्के एवढा आहे.
बीड जिल्ह्यात आज 58 कोरोना पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 436 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 58 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 378 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 13 आष्टी 3 बीड 25 धारूर 2 केज 4 माजलगाव 3 परळी 4 पाटोदा 2 शिरूर 2