राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
मुंबई, 18 फेब्रुवारी : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या राजकीय नेत्यांनाही या व्हायरसची झपाट्याने लागण होत असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचाही कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
राजेश टोपे यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी,’ असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.