आज आकडा वाढला :बीड जिल्ह्यात आज 37 कोरोना पॉझिटिव्हची भर
बीड जिल्ह्यात आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 446 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 37 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 409 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 17 आष्टी 5 बीड 7 केज 5,माजलगाव 1 परळी 2
आज 23 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे बीड जिल्ह्यात 18275 बाधीत संख्या झाली असून 17494 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत आतापर्यंत 571 जण दगावले असून सध्या 197 जणांवर उपचार सुरू आहेत
राज्यात कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.काल दिवसभरात राज्यभरात 4 हजार 787 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20 लाख 76 हजार 093 झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे.
काल 3853 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आजपर्यंत एकूण 19 लाख 85 हजार 261 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.62 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 1 लाख 95 हजार 704 जणांना होमक्वॉरन्टीन असून 1664 जण इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टीनमध्ये आहेत. राज्यात सध्या 38 हजार 013 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत