लोहारा येथे थेट शेतकऱ्याच्या बांधावर खते बियाणे खरेदी विक्री
उस्मानाबाद /प्रतिनिधी
आज लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कृषी विभाग लोहारा अंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे योजनेअंतर्गत एकत्रित खते व बियाणे खरेदी करून वाटप करण्यात आलेत यावेळी
झुआरी अॅग्राे केमिकल लिमिटेड मार्केटिग आॅफिसर अतुल लहाने व गजानन कृषी सेवा केंद्र लोहारा प्रसाद जट्टे यांच्या सहकार्याने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान लोहारा मध्ये कार्यान्वित असलेले जेवळी येथील नवप्रभा महिला प्रभाग संघ मार्फत स्फूर्ती महिला ग्राम संघ दक्षिण उज्वल महिला ग्राम संघ जेवळी तांडा कल्पवृक्ष महिला ग्राम संघ अष्ठा कासार व नवनिर्माण महिला ग्रामसंघ रुद्रवाडी येथील उमेदीच्या महिला बचत गटांना माफक दराने खते व बियाणे गावात करण्यात आले यामध्ये उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार सर , तालुका मंडळ कृषी अधिकारी सचिन चंडकाळे सर उमेद चे जेवळी प्रभागाचे प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर हुडेकर यांचे योगदान आहे..
आजचा कार्यक्रम प्रसंगी दक्षिण जेवळी येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व कृषी विभाग लोहारा अंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे योजनेअंतर्गत व ग्राम संघामार्फत एकत्रित खते व बियाणे खरेदी उपक्रम उपक्रमाअंतर्गत एकत्रित खते बियाणे खरेदी करण्यात आले तसेच महिलांना घरगुती बियाणे उगवण क्षमता डेमो दाखवण्यात आले या प्रसंगी उमरगा मतदारसंघाचे आमदार माननीय ज्ञानराज चौगुले सर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मंगरूळकर साहेब कृषी उपसंचालक काशीद साहेब तालुका कृषी अधिकारी बीडबाग साहेब कृषी अधिकारी माळी साहेब कृषी सायक गणेश बिराजदार दक्षिण जेवळी उत्तर जवळी सरपंच साहेब तसेच सेंद्रिय शेती तालुका समन्वयक नरेंद्र गवळी सर शेती प्रभाग समन्वयक शिव शंकर कांबळे व प्रदीप चव्हाण सर प्रभाग समन्वयक आविनाश चव्हाण सर व दक्षिण जेवळी च्या प्रेरिका मनीषा कारभारी व रूपाली कारभारी या कार्यक्रमास उपस्थित होत्या..