बीड

कोरोना अपडेट :बीड जिल्ह्यात आज फक्त 16 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 12 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 430 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 16 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 414 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 4 आष्टी 4 बीड 3 गेवराई 1 केज 1 परळी 1 माजलगाव 2

राज्यात ३,२९७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०,५२,९०५ झाली आहे. राज्यात ३०,२६५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५१,४१५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५ टक्के एवढा आहे.
आज ६,१०७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,७०,०५३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात भारतात 12,923 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 108 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 11,764 नवे नागरिक बरे झाले आहेत.

भारतात कोरोनाचे 1,08,71,294 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 1,42,562 झाली आहे. एकूण 1,05,73,372 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,55,360 पोहचला आहे.

आतापर्यंत देशात 70,17,114 नागरिकांचे लसीकरण झाले. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.