बीड

बीडच्या एमआयडीसीमधील रस्त्याच्या कामाला मंजुरी:माजीमंत्री क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश

बीड/प्रतिनिधी
बीड शहरालगत असलेल्या एम आय डी सी परिसरातील रस्त्याच्या कामाला आणि एमआयडीसी परिसर विकसित करण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून यासाठी वैष्णवी पॅलेस ते आकाशवाणी रोड साठी 36 लाख 86 हजार मंजूर झाले आहेत तर वृंदावन गार्डन ते वैष्णवी पॅलेस पर्यंतचा रस्ता कामास 1 कोटी 3 लाख मिळणार आहेत, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे यामुळे नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे

बीड शहरातील एमआयडीसी रामतीर्थ परिसर 68.83 हेक्‍टर क्षेत्रावर विकसित करण्यात आला आहे हा परिसर बीड शहरालगत असून औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक यांनी 22 पासून एक किलोमीटर अंतरावर आहे औद्योगिक क्षेत्रात 238 पैकी भूखंड तयार करण्यात आले होते बहुतेक भूखंड धारकांनी उद्योग इमारत बांधून भोगवटा प्रमाणपत्र ही घेतले आहे या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसी तर्फे डांबरी रस्ते पथदिवे पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र या भागातील प्रमुख रस्त्यांची कामे होणे गरजेचे होते माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन या कामाला मंजुरी देण्याची मागणी केली होती

त्यानुसार उद्योगमंत्र्यांनी मान्यता दिली असून नगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वृंदावन गार्डन ते वैष्णवी पॅलेस रस्ता कामास सुरुवात होईल यासाठी 1 कोटी 3 लाख अंतिम मंजुरी मिळाली आहे तर वैष्णवी पॅलेस ते आकाशवाणी या रस्त्यासाठी 36 लाख 86 हजार मंजूर झाले असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे हा रस्ता झाल्यानंतर या भागातील नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे असल्याचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले आहे