उस्मानाबाद जिल्हात करोनाचे 6 नवे रुग्ण
उस्मानाबाद प्रतिनिधी
एकेकाळी कोरोनामुक्त असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मुंबई पुणे रिटर्न्स नागरिक धोकादायक ठरत असून 6 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आलेत त्यातील परंडा तालुक्यातील 2, भूम तुळजापूर लोहारा आणि उस्मानाबाद मधील प्रत्येकी 1रुग्ण पॉझिटिव्ह आहेत पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण मुंबई पुणे येथून आलेले आहेत.
परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडीचे 2 जण, भूम तालुक्यातील गिरवलीचा 13 वर्षाचा मुलगा, उस्मानाबाद शहरातील एक तरुण, लोहारा तालुक्यातील जेवळी चा एक तरुण, तुळजापूर ची एक महिला पॉझिटिव्ह आली आहे.. विशेष म्हणजे तुळजापूर ची महिला पुण्यावरून आली आहे बाकी सर्व जण पुण्यावरून आले आहेत. उस्मानाबाद मध्ये आल्यानंतर वरील 6 जणांना क्वारंटाईन केले होते..जिल्हात दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण वाढत आहेत मंगळवारी 19 मे रोजी 6 रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. मंगळवारी 6 रुग्ण सापडल्याने उस्मानाबाद जिल्हातील रुग्णाचा आकडा 16 वर गेला आहे त्यापैकी 13 जणांवर उपचार चालू आहेत 3 रुग्ण बरे झाले आहेत.विलासराव देशमुख शासकीय वैधकीय विज्ञान संस्थेत उस्मानाबाद जिल्हातील 49 व्यक्तीचे स्वब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 42 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांनी दिली..