आता सर्वच चार चाकी वाहनांसाठी ‘फास्टॅग’अनिवार्य:जाणून घ्या नियमातील बदल
मुंबई : यावर्षी नोव्हेंबरमध्ये परिवहन मंत्रालयाने सर्व चारचाकी वाहनधारकांना एफएएसटीएग १ जानेवारी २०२१ लागू करण्याचे आदेश प्रसिद्ध केले होते. त्या नुसार आता सर्व वाहनांसाठी ‘फास्टॅग’ अनिवार्य असणार आहे. अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती.
देशातील टोल वसुली सुलभ आणि रहदारी सुरळीत करण्यासठी सरकारकडून हे पाउल उचलण्यात आले आहे. २०१७ पासून, नवीन चार चाकी वाहनांच्या नोंदणीसाठी एफएएसटीएग अनिवार्य करण्यात आले होते आणि ते वाहन निर्माता किंवा त्यांच्या व्यापा ्यांद्वारे पुरविले जात होते.
त्यांनतर आता अद्याप देखील अनेक वाहन चालकांच्या फास्टॅग प्रक्रिया पूर्ण झाली नसून या पार्श्वभूमीवर 1 जानेवारीपर्यंत जर तुमच्या गाडीमध्ये फास्टॅग नाही लावण्यात आला होते, त्या नंतर ही डेडलाईन सरकारकडून वाढवली गेली तर 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व वाहनांवर फास्टॅग स्टिकर बसवणे बंधनकारक असेल.
फास्टॅग च्या अंमलबजावणीची नवीन अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती.
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानुसार फास्टॅगची किंमत 200 रुपये आहे. यात तुम्ही किमान 100 रुपये रिचार्ज करू शकता. जोपर्यंत फास्टॅग स्कॅनर स्कॅन करतो, तोपर्यंत फास्टॅग काम करेल. तर पहिले असलेली फास्टॅग खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट आता असणार नाही. टोल प्लाझावर ट्रॅफिक जामची परिस्थिती उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये केवळ प्रवासी वाहनांसाठी फास्टॅग चे नियम बदलण्यात आले आहेत. व्यावसायिक वाहनांसाठी अद्याप जुना नियम लागू आहे. फास्टॅग च्या खरेदीदरम्यान, प्रवासी वाहनांच्या जसेकी कार, जीप, व्हॅनसाठी सिक्युरिटी म्हणून काही शिल्लक ठेवणे बंधनकारक होते. टोल प्लाझावरुन जात असताना ड्रायव्हरच्या फास्टॅग रिचार्ज नसल्यास वाहनांना टोलवर थांबावं लागत होतं. यामुळे टोल प्लाझावर ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. पण आता असं होणार नाही. टोल प्लाझा पार केल्यानंतर, जर आपल्या खात्यात उणे शिल्लक राहिली असेल तर, बँक सिक्युरिटी मनी वसूल करू शकेल, जे वाहन मालकास पुढील रिचार्जवर भरावे लागेल.
जर आपण अद्याप आपल्या वाहनावर फास्टॅग स्टिकर लावले नसेल तर तुम्हाला ते लवकरच लावले पाहिजे. पेटीएम, अॅमेझॉन, स्नॅपडील इत्यादींकडून फास्टॅग खरेदी केलं जाऊ शकतं. तसेच, देशातील 23 बँकांच्या माध्यमातून फास्टॅग उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त रस्ते वाहतूक प्राधिकरण कार्यालयातही फास्टॅग ची विक्री केली जाते. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) त्यांच्या उपकंपनी इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (आयएचएमसीएल) च्या माध्यमातूनही फास्टॅग ची विक्री करते.