नवे कृषी कायदे हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी:कुणावरही सक्ती केलेली नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत कृषी कायद्यांच्या अनुषंगाने भाषण केलं. आंदोलनासाठी बसलेल्या शेतकरी बांधवांना फितवलं जात आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करतो, असं म्हणतं नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्याच वेळी नवे कृषी कायदे हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहेत. त्यात कुणावरही सक्ती केलेली नाही. शेतकऱ्यांना उलट पर्याय दिलेला आहे, असा खुलासा त्यांनी केला.
यावेळी पंतप्रधानांनी कृषी कायदाबद्दलच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिली. त्यांनी तीन कृषी कायद्यांचं महत्त्व अधोरेखित करताना म्हटलं की, कृषी क्षेत्रात विविध सुधारणा होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करायला हवेत. पण कृषी कायद्यांबद्दल जास्तीत जास्त अफवा पसरवली जात आहे. विरोधकांनी कायद्याच्या अनुषंगाने चर्चा केली असती तर बरं झालं असतं, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधानाच्या भाषणांतील मुद्दावर काँग्रेस पक्षाने अनेक प्रश्न उपस्थित करत आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या भाषणाचा निषेध करत सभात्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी विरोधी पक्षाला टोला लगावताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्षाने कृषी कायद्याच्या कलरपेक्षा त्यातील मजकूरावर चर्चा करायला हवी होती. त्यानंतर सभागृहात विरोधी पक्षाकडून गोंधळ करण्यात आला आहे.