बीड

कोरोना आटोक्यात येऊ लागला :बीड जिल्ह्यात आज 19 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 9 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 363 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 19 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 354 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.गेल्या 3 दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसत आहे काही तालुक्यात संसर्ग नसल्याचा अहवाल येत आहे ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 4 आष्टी 3 बीड 3 गेवराई 2 केज 4 पाटोदा 3

महाराष्ट्रात आत्तापर्यंत दीड कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चाचणीच्या तुलनेत रुग्ण सकारात्मकतेचा दर 13.63 टक्के एवढा आहे. आज दिवसभरात राज्यात 2 हजार 216 कोरोना रुग्णांची नव्याने वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 34 हजार 720 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज झालेल्या वाढीमुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 46 हजार 287 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 58 हजार 971 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज 3 हजार 423 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आज 15 रुग्ण दगावले असून आतापर्यंत राज्यात 51 हजार 325 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.