बीड

कोरोना अपडेट :बीड जिल्ह्यात आज 18 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 8 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 308 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 18 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 290 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 6 बीड 4 धारूर 4 परळी 1 शिरूर 3

राज्यात २,६७३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०,४४,०७१ झाली आहे. राज्यात आज एकूण ३५,९४८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, आजपर्यंत ५१,३१० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५१ टक्के एवढा आहे.
राज्यात आज ३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे,आज १,६२२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,५५,५४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६७ टक्के एवढे झाले आहे.