कोरोना अपडेट :बीड जिल्ह्यात आज 18 कोरोना पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 6 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 475 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 18 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 457 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 2 आष्टी 3 बीड 10 परळी 3
राज्यात शुक्रवारी २,६२८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०,३८,६३० झाली आहे. राज्यात एकूण ३३,९३६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ४० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५१,२५५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५१ टक्के एवढा आहे.
शुक्रवारी ३,५१३ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १९,५२,१८७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के एवढे झाले आहे.
नवी दिल्ली । देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 12 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 120 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 12,408 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर 120 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1 कोटी 08 लाख 02 हजार 591 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 1 लाख 51 हजार 460 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 54 हजार 823 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 1 कोटी 04 लाख 96 हजार 308 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.