बीड

कोरोना अपडेट :बीड जिल्ह्यात आज 33 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 5 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 536 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 33 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 503 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 3 आष्टी 2 बीड 21 धारूर 1 गेवराई 1केज 2, परळी 2 शिरूर 2 वडवणी 1

राज्यात २,७३६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,३६,००२ झाली आहे. राज्यात आज ३४,८६२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ४६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५१,२१५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे.
आज ५,३३९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,४८,६७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७१ टक्के एवढे झाले आहे.

गेल्या 24 तासात भारतात 12,899 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 107 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 17,824 नवे नागरिक बरे झाले आहेत.

भारतात कोरोनाचे 1,07,90,183 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 1,55,025 झाली आहे. एकूण 1,04,80,455 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,54,703 पोहचला आहे. आतापर्यंत देशात 44,49,552 नागरिकांचे लसीकरण झाले.ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली