ऑनलाइन वृत्तसेवा

सरकारी नौकरीची संधी:कॅगमध्ये 10811 जागांसाठी थेट मेगा भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि पात्र असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. भारताचे महालेखापाल म्हणून ज्या संस्थेची धास्ती साऱ्या राज्य सरकारांना असते त्या कॅगमध्ये (CAG Recruitment 2021) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

कॅगमध्ये 10811 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी योग्य आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अधिकृत नोटीस cag.gov.in वर जाऊन पाहता येणार आहे. किंवा थेट लिंक खाली देण्यात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार 6409 जागा लेखा परीक्षक आणि 4402 पदे लेखापाल म्हणून भरण्यात येणार आहेत. उमेदवार या पदांसाठी 19 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

CAG Recruitment 2021 साठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन नीट वाचावे. यानंतर अर्ज डाऊनलोड करावा. काळजीपूर्वक अर्ज भरावा. यानंतर हा अर्ज स्पीड पोस्टाने “Shri V S Venkatanathan, Asstt. C &AG (N), O/o the C&AG of India, 9, Deen Dayal Upadhyay Marg, New Delhi- 110124.” या पत्त्य़ावर पाठवावा लागणार आहे.

या पदांसाठी कोणत्य़ाी मान्यतप्राप्त बोर्ड, विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी असणे बंधनकारक आहे.

CAG Recruitment 2021 साठी वयाची अट 18 ते 27 वर्षे ठेवण्यात आली आहे. याचबरोबर वेगवेगळ्या आरक्षणानुसार वयात सूट दिली जाणार आहे.

दोन्ही पदांसाठी पगार 29200-92300 हजार प्रतिमहिना असणार आहे.