बीड

नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांला अपमानास्पद वागणूक

अनुपालन अहवाल लपवणाऱ्यावर कारवाई होणार का ?

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांचा गलथान कारभार ऐन नियोजन समितीच्या बैठकीत उघडीस आला आहे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना बैठकीतून बाहेर काढून अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार आज घडल्याने अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्यात आल्याची भावना पसरू लागली आहे नेमका हा प्रकार कुणी व का केला असावा हा संशोधनाचा भाग आहे की शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या न प च्या कामात खोडा घालण्याचा प्रकार हे मात्र समजू शकले नाही

जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत इतीव्रताच्या(अनुपालन) मुद्द्यांच्या अनुषंगाने बीड नगरपालिकेने पत्र क्रमांक/ 3066 /दि 17 /12/ 2020 अन्वये जिल्हा प्रशासन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्याकडे सादर केले होते सदरील अनुपालन अहवाल जिल्हा प्रशासन अधिकारी कार्यालयाकडून नियोजन अधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याबाबत हलगर्जीपणा केल्यामुळे सदरील अनुपालन जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडे पोहोचला नाही यात बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुटे यांच्या कडून कसल्याही प्रकारची चूक झालेली नाही सदरील बाब बैठक झाल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे आणि जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या निदर्शनास आणून देण्यात यात आली तेव्हा मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांची चूक नसल्याचे लक्षात आले व आपण तर प्रामाणिक आहात असेही पालकमंत्री गुट्टेना म्हणाले,वास्तविक पाहता एक महिन्यापूर्वी दिलेला अनुपालन अहवाल हा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत का पोहोचला नाही हा संशोधनाचा विषय आहे असे असले तरी एका अधिकाऱ्याला बैठकीतून बाहेर काढून अपमानास्पद वागणूक हे कितपत योग्य आहे?डॉ उत्कर्ष गुट्टे यांनी कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या सूचनेवरून दिवसरात्र शहरात प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत अशा अधिकाऱ्यांना अशी वागणूक देऊन त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयन्त झाल्याने इतर अधिकाऱ्यांमध्ये वेगळी भावना निर्माण होऊ शकते अधिकारी हा कोणत्या पक्ष्याचा नसतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असा प्रकार व्हायला नको होता पण यामागे देखील नक्कीच काही तर दडले असावे हा अनुपालन अहवाल समिती पर्यंत न पोहचू देण्यामागे काय उद्देश असेल ?अहवाल झाकून ठेवणारावर पालकमंत्री व जिल्हाधिकारी कारवाई करणार का ?असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे