ऑनलाइन वृत्तसेवा

श्रीराम मंदिर उभारणीसाठी फडणवीसांनी दिली एक लाख एक रुपयांची रक्कम

मुंबई – माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते ( Devendra Fadnavis ) देवेंद्र फडणवीस यांनी आज अयोध्येतील भव्य राम मंदिर ( Ram Mandir Temple ) उभारण्यासाठी 1,00,001 रुपयांची देणगी दिली. त्यांनी ही देणगी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी याबाबत ट्विटव्दारे माहिती दिली आहे.

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर अयोध्येत साकारले जातेय, ही आपल्या सर्वांसाठी स्वप्नपूर्तीच! या राष्ट्रीय कार्यात एक कारसेवक म्हणून आज माझा खारीचा वाटा श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी जी महाराज यांच्याकडे समर्पित करता आला, हे माझे भाग्य! आपणही आपले योगदान द्या! “