बीड

कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 28 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 646 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 32 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 614 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 14 आष्टी 3 बीड 7, गेवराई 2 केज 1 परळी 3 शिरूर 2

महाराष्ट्रात आज दिवसभरात 2,171 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर, 2,556 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्याच्या घडीला 43 हजार 393 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 15 हजार 524 एवढी झाली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी 19 लाख 20 हजार 006 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

देशभरात मागील २४ तासांमध्ये ११ हजार ६६६ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ७ लाख १ हजार १९३ वर पोहचली आहे. देशात सध्या १ लाख ७३ हजार ७४० अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १ लाख ५३ हजार ८४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.मागील २४ तासांत देशभरात १४ हजार ३०१ जणांनी करोनावर मात केली आहे. तर, देशात आतापर्यंत १ कोटी ३ लाख ७३ हजार ६०६ जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे.