बीड

बीडच्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकला पाहिजे-माजी खा चंद्रकांत खैरे /मराठवाडा भगवामय करण्यासाठी पुन्हा ताकतीने उभा राहा- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार होतो आहे योग्य नियोजनामुळे हे यश आपल्याला मिळाले आहे लोकांनी आपल्याला कौल दिला आहे तो केवळ मोठ्या अपेक्षा ठेवूनच आता मराठवाडा भगवामय करण्यासाठी पुन्हा ताकतीने उभा रहा असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे तर आगामी काळात बीड जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांनी गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक ही संकल्पना राबवून बीडच्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल असे काम करावे असे आवाहन माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे

बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेला चांगले यश मिळाले बीड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्या आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्व विजयी उमेदवारांचा भव्य सत्कार सिंहगड लॉन्स सभागृहात आयोजित करण्यात आला होता

यावेळी माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर माजीमंत्री बदामराव पंडित नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे सचिन मुळक माजी जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप बाळासाहेब पिंगळे शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख ऍड संगीता चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले सत्कार सोहळ्यात बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की बीड जिल्ह्यात जयदत्त अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे त्यांच्यामुळे मोठी ताकद आता शिवसेनेला प्राप्त झाली आहे आता यापुढे येणाऱ्या निवडणुका आपल्याला जिंकून दाखवायचे आहेत यासाठी गाव तिथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक होणे महत्त्वाचे आहे विकासाची संकल्पना पूर्ण करण्यासाठी सेनेची ताकद वाढवणे गरजेचे आहे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत प्रत्येक ग्रामपंचायतला आता भरघोस विकास निधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे गावचा विकास करण्यासाठी शिवसेना कटीबद्ध राहणार आहे सर्वसामान्य शिवसैनिक सत्तास्थानी असला पाहिजे यासाठी प्रत्येकाने आता जागृत राहावे आगामी काळात बीडच्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकला पाहिजे असा संकल्प शिवसैनिकांनी करावा


यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचे निमित्त साधून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार होतो आहे योग्य नियोजनामुळे हे यश मिळाले असून जनतेने आपल्याला कौल दिला आहे तो केवळ मोठ्या अपेक्षा ठेवूनच आता खूप चांगले वातावरण निर्माण झाले आहे चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे मोठी शक्ती ग्रामीण भागात आहे हातच्या काकणाला आरसा कशाला अनेक दावे काही लोक करू लागले आहेत आमच्या इतक्या ग्रामपंचायत ताब्यात आल्या आम्ही मोठे यश मिळवले असे दावे करणारे आता तोंडावर पडले आहेत पण आमच्याकडे आरसा आहे विधानसभेच्या वेळी पावसामुळे थांबलेल्या कामाचा बाऊ करून जनतेत संभ्रम निर्माण केला आणि त्यामुळेच आपल्याला पराभव स्वीकारावा लागला नसता विजय आपलाच होता आता रस्ते झाल्यावर लोकांना चांगले वाटू लागले आहे निवडणूक काळात आम्ही सांगत होतो हे आज त्रास होईल परंतु भविष्यात त्याचा फायदा होणार आहे मात्र लोकांनी अफवांवर विश्वास ठेवला आता पण सुरू झाला आहे विकासाच्या नावाचा कुठलाही नारळ अजून तरी फुटलेला नाही त्यामुळे जनतेचे मत आता पुन्हा बदलू लागले आहे मराठवाडा भगवामय करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी ताकतीने उभे राहणे गरजेचे आहे विकासासाठी शासनाकडे मुख्यमंत्र्यांकडे आपण मागण्या केल्या आहेत विकास करण्यासाठी निधी मिळाला तरच पुढे यश कायम राहील पुढच्या सगळ्या निवडणुका आपणाला जिंकायच्या आहेत खचून जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा ठाम विश्वास माजी मंत्री क्षीरसागर यांनी व्यक्त करताच सभागृहात शिवसैनिकांनी घोषणा देत टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले तर नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत बीड नगरपालिकेच्या सभापती निवडणुकीत सर्व सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे सांगितले हे चांगले यश शिवसेनेला मिळाले आहे आता शहराबरोबरच ग्रामीण विकास करण्यासाठी अधिक निधी आणण्याचा प्रयत्न करूया या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता पुढच्या निवडणुकीमध्ये देखील असेच यश मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली
यावेळी प्रास्ताविक कालिदास नवले यांनी केले
यावेळी अरुण डाके अनिल जगताप बाळासाहेब पिंगळे सचिन मुळुक, नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर कुंडलिक खांडे माजी मंत्री बदामराव पंडित आदींनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी बीड नगर परिषदेच्या सर्व नवनिर्वाचित सभापतीचा देखील सत्कार करण्यात आला, तसेच बीड शहरात सलग सहा वेळा निवडूूूून आल्याबद्दल विष्णुपंत वाघमारे यांचाही सत्कार करण्यात आला तर अरुण डाके यांनाही वाढदिवसानिमित्त यावेळी शुभेच्छााा देण्यात आल्या
यावेळी उपजिल्हाप्रमुख हनुमान पिंगळे हनुमान जगताप आशिष मस्के भाऊसाहेब लटपटे शेख एजाज बबलू खराडे सुशील पिंगळे रामराजे सोळंके अभयकुमार ठक्कर तालुकाप्रमुख गोरख शिंगण कालिदास नवले किरण चव्हाण कुमार शेळके राहुल चवरे रत्नाकर शिंदे व्यंकटेश शिंदे अर्जुन वाघमारे आप्पा जाधव बाळासाहेब कुरुंद संदीप माळी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी नितीन धांडे बप्पासाहेब घुगे परमेश्वर सातपुते,वैद्यनाथ तांदळे सुनील सुरवसे रतन गुजर शीनुभाऊ बेदरे मशरू खान पठाण जयसिंग चुंगडे भास्कर जाधव शिवाजी जाधव किशोर पिंगळे भीमराव वाघचौरे विनोद मुळुक शुभम धूत बाळासाहेब आंबोरे अरुण डाके विलास बडगे दिनकर कदम दिलीप गोरे डॉ योगेश क्षीरसागर रंजीत आखाडे सखाराम देवकर कल्याण कवचट गणपत डोईफोडे ऍड राजेंद्र राऊत बाळासाहेब गुंजाळ सखाराम मस्के अरुण बोगाने आदी उपस्थित होते