बीड

कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 25 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 648 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 20 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 628 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 5 आष्टी 3 बीड 8, गेवराई 1 माजलगाव 1 शिरूर 2

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. राज्यात काल दिवसभरात 2 हजार 752 नवे करोनाबाधित आढळले असून, 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1 हजार 743 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 20 लाख 9 हजार 106 वर पोहचली आहे. राज्यातील ऍक्‍टिव्ह रुग्ण संख्या 44 हजार 831 असून, 19 लाख 12 हजार 264 जण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. तर, 50 हजार 785 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशातील करोना संसर्ग अद्याप आटोक्यात आलेला नाही. अद्यापही दररोज नवीन करोनाबाधितांची नोंद होत आहे. याशिवाय करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतच आहे. मागील २४ तासांत देशभरात१३ हजार २०३ नवे करोनाबाधित आढळले असून, १३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, १३ हजार २९८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
याशिवाय, १ लाख ५३ हजार ४७० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयाने ही माहिती दिली आहे.