कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 24 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 687 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 40 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 647 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 8 आष्टी 2 बीड 11, केज 4 माजलगाव 3 पाटोदा 1शिरूर 11 शिरूर 10
राज्यातील करोना संसर्ग अद्यापही सुरूच आहे. मात्र, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज मोठी भर पडत असल्याचे दिसत आहे.काल दिवसभरात ३ हजार ६९४ जणांना करोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२२ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात १९ लाख १० हजार ५२१ जणांनी करोनावर मात केली आहे.
याशिवाय काल दिवसभरात राज्यात २ हजार ६९७ नवे कोरनाबाधित रुग्ण आढळले असून, ५६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २० लाख ६ हजार ३५४ वर पोहचली आहे. याशिवाय राज्यात ४३ हजार ८७० अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, ५० हजार ७४० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे
नवी दिल्ली । देशात कोरानाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 14,849 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. शनिवारी समोर आलेल्या आकडेवारीपेक्षा आजच्या कोरोना आकडेवारीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 14,849 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 155 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1 कोटी 6 लाख 54 हजार 533 एवढा झाला आहे.
सध्या देशातील विविध भागात 1 लाख 84 हजार 408 रुग्णांवर उपचार सुरु असून, उपचारादरम्यान आतापर्यंत 1 लाख 53 हजार 339 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे