ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

महत्वाची बातमी:10 वी 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

अखेर दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या तारख्या जाहीर झाल्या आहेत. कोरोनामुळे शाळांचे वेळापत्रक कोलमडले आहे. राज्य सरकारने दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांचा तारखा जाहीर झाल्या आहेत. माध्यमिक शालांत दहावी परिक्षा २९ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या कालावधीत होणार आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार आहे.याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे

दुसरीकडे १२ वीच्या परीक्षा २३एप्रिल ते २९ मे या कालावधीत परिक्षा होणार आहे.जुलैच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे.

बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे.
तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे. सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिवाय लॉकडाऊन काळातही ऑनलईन वर्ग सुरु होते.