कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 21 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 561 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 30 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 530 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 9 आष्टी 1 बीड 16, गेवराई 1 केज 1परळी 2
राज्यात गेल्या २४ तासात ४ हजार ५८९ जणांनी मात केली. तर, ३ हजार १५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, ५९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या १९ लाख ९७ हजार ९९२ वर पोहचली आहे. सध्या देशात ४६ हजार ७६९ अॅक्टिव्ह केसेस असून, आजपर्यंत १८ लाख ९९ हजार ४२८ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, ५० हजार ५८२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हीर रेट) ९५.७ टक्क्यांवर पोहचले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपर्यंत १,३९,५७,४६९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी १९ लाख ९७ हजार ९९२ (१४.३१ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत.