गेवराईबीड

वै.नारायणदास महाराज यांचा चकलांबा येथे शुक्रवारी पुण्यतिथी सोहळा


महामंडलेश्वर स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वतीजी यांचे कीर्तन


बीड दि.20 (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील श्रीक्षेत्र पंचाळेश्वर मंदिराचे स्वानंद सुखनिवासी दिवंगत मठाधिपती वै.नारायणदास स्वामी महाराज यांच्या चतुर्थ पुण्यतिथीच्या निमित्ताने समाधीचा महाभिषेक व महामंडळेश्वर 1008 स्वामी त्रिवेद्रानंद सरस्वतीजी महाराज, गणेशनंदगड यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.


चकलांबा येथील पंचाळेश्वर महादेवाचे प्राचीन कालीन मंदिर आहे. याठिकाणी स्वामी नारायणदासजी महाराज यांनी पंचाळेश्वर महादेव मंदिरात आयुष्यभर सेवा केली. शिवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने कीर्तन, प्रवचन आणि शिवलिला अमृत कथेचे आयोजन करत. परिसरातील अडाणी, अज्ञानी व सर्वसामान्य लोकांना परमार्थ आणि मानुसकीचे महत्व त्यांनी सांगीतले. आयुष्यभर मंदिरात येणार्‍या भाविक व परिसरातील गोरगरीबासाठी कष्ट घेतले. चार वर्षापूर्वी नारायणदास महाराज यांचे देहावसान झाले. दरवर्षी त्यांची पुण्यतिथी चकलांबा परिसरातील भाविकांच्या वतीने साजरी केली. जाते. दि.22 जानेवारी 2021 रोजी त्यांची चतुर्थ पुण्यतिथी सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 7.45 वाजता ब्रम्हवृंदाच्या हस्ते समाधीचा महाभिषेक होणार आहे. तर सकाळी 11.00 ते 1.00 दरम्यान महामंडळेश्वर स्वामी 1008 त्रिवेंद्रानंद सरस्वतीजी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. रात्री कबीरपंथी भजनी मंडळ व श्री रोकडेश्वर सांप्रदायीक भजनी मंडळाचा जागर होणार आहे.
या कार्यक्रमास ह.भ.प. ईश्वरस्वरूप चैतन्य महाराज, मठाधिपती कल्याणस्वामी संस्थान, चकलांबा, ह.भ.प. हनुमान महाराज गिरी, गणेश महाराज, रामायणाचार्य एकनाथ महाराज गाडे, सखाराम महाराज तांगडे, गौतम महाराज गुंजाळ, कैलास महाराज खेडकर, अंगद महाराज निंबाळकर, प्रदीप महाराज खेडकर आदी संत-महंताची उपस्थिती राहाणार आहे. चकलांबा आणि परिसरातील भाविकांनी कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


दरम्यान उस्मानाबाद येथील लेखाधिकारी आप्पासाहेब पवार हे पोलिस उपअधिक्षक परिक्षा पास झाल्यामुळे त्यांचा बीड येथे मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला