बीड

कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 629 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 43 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 586 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.बीड जिल्ह्यात 17388 कोरोना बाधित संख्या झाली असून त्यात 16578 कोरोना मुक्त झाले आहेत आतापर्यंत 550 रुग्ण दगावले आहेत सध्या 260 रुग्णावर उपचार सुरू आहेत

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 15 आष्टी 2 बीड 16,धारूर 1 गेवराई 3 केज 4 माजलगाव 1 वडवणी 1

काल एका दिवसात महाराष्ट्र राज्यात 2,294 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 19,94,977 वर पोहोचली आहे. काल 4,516 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,94,839 वर पोहोचली आहे. काल राज्यात 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 50,523 वर जाऊन पोहोचली आहे. राज्यातील एकूण ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 48,406 वर जाऊन पोहोचली आहे.

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात 13,823 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशांतील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,05,95,660 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 16,988 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,02,45,741 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 162 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,52,718 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 1,97,201 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.