व्हॅक्सिनेशन कार्ड इतके महत्त्वाचे का आहे:लसीकरण केल्यास आरोग्यासाठी दीर्घकालीन संरक्षण
आपल्या बाळाला लसीकरण कार्डवरील वेळापत्रकानुसार लस द्यावी, अशी शिफारस रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) यांच्याकडून केली जाते. अशाच पद्धतीचा सल्ला बालरोगतज्ज्ञांकडून दिला जातो, जेणेकरून भविष्यात निर्माण होणाऱ्या गंभीर आजारांविरोधात लढण्यासाठी मुलांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती योग्य पद्धतीने विकसित होण्यास मदत मिळेल. कारण एखाद्या विशिष्ट वयात पोहोचल्यानंतर मुलांना विशिष्ट आजारांची लागण होण्याची शक्यता असते, म्हणूनच विज्ञानावर आधारित आणि सुरक्षित असलेल्या वेळापत्रकाचे अनुसरण करणे गरजेचं आहे. या लसीकरण कार्डवरील वेळापत्रकाचे पालन केल्यास आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्यांना वारंवार भेट देण्याची संख्या कमी होते आणि मुलाच्या आरोग्यावर योग्य नियंत्रण मिळवल्याचीही भावना आईला मिळते.
वयानुसार लसीकरणाचे वेळापत्रक सर्वसाधारणपणे प्रत्येक पालक पहिल्या वर्षामध्ये सर्व लसींचे काळजीपूर्वक पालन करतात आणि जसजसे मूल वाढत जाते, तसतसे येणाऱ्या लसीकरणांमध्ये ते आत्मसंतुष्ट होऊ लागतात. बाळाच्या आयुष्यातील पहिले पाच वर्षे त्यांच्या लसीकरणाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामध्ये खालील लसींचा समावेश आहे :
जन्मावेळी :
बीसीजी (क्षयरोग)
हेपेटायटिस बी
ओपीव्ही (ओरल पोलिओ लस)
६ आठवडे ते ६ महिने दरम्यान
डीटीपी, Hib, हेप-बी, आयपीव्ही
पीसीव्ही (न्युमोकोकल कन्जुगेट लस)
रोटाव्हायरस
६-१२ महिन्यांदरम्यान
इन्फ्लूएंझा (5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी वार्षिक शिफारस)
एमएमआर (गोवर, गालगुंड आणि रुबेला)
टायफॉइड
मेनिंगोकोकल
१ ते २ वर्षांदरम्यान
हेपेटायटिस अ
कांजण्या
डीटीपी, एचआयबी, आयपीव्ही
न्युमोकोकल
एमएमआर
२ ते ६ वर्षांदरम्यान
मेनिंगोकोकल
एमएमआर, डीटीपी, आयव्हीपी
भारतीय बालरोगशास्त्र अकादमीद्वारे सन २०२०-२१ मधील व्हॅक्सिनेशन आणि इम्युनायझेशन पद्धती, सल्लागार समितीनुसार वेळापत्रक :-
विशिष्ट परिस्थितीसाठी
डीटीपी: डिप्थेरिया, धनुर्वात, डांग्या खोकला; एचआयबी: हेमोफिलस इन्फ्लुएंझा प्रकार बी; हेप-बी: हेपेटायटीस बी; आयपीव्ही: इंजेक्टेबल पोलिओ लस
लसीकरण कार्डबाबत मुख्य माहितीः
लसीकरण कार्ड हा एक मूलभूत आरोग्यविषयक दस्तऐवज आहे, बालरोगतज्ज्ञांना भेट देताना हे कार्ड नेहमी सोबत घेऊन जावे. पालक जेव्हा बालरोगतज्ञांना भेट देतात तेव्हा त्यांनी कार्ड अपडेट करणं महत्त्वाचे आहे. यामुळे एखादे लसीकरण केल्यास किंवा लसीकरण चुकवल्यास पालक भविष्यात लसीकरणाच्या माहितीबाबत अधिक तयार होऊ शकतात. अशा परिस्थितीत महत्त्वाचे पाऊल म्हणजे लसीकरणासंदर्भात बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि गोष्टी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. याबाबत पालकांना अधिक सज्ज ठेवण्यासाठी, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या इम्युनाइज इंडिया अॅप द्वारे बर्याच विनामूल्य डिजिटल लसीकरण रिमाइंडर सेवा देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लसीकरण कार्ड अपडेट ठेवण्याव्यतिरिक्त, या सेवा पालक आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी अतिरिक्त सक्रिय असल्याचेही सुनिश्चित करतात.
आपल्या मुलाच्या आरोग्याचा प्रश्न असताना लसीकरण प्रक्रियेमध्ये कोणताही नियम लागू नसतो. वेळेवर लसीकरण केल्यास आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी दीर्घकालीन संरक्षण मिळते आणि त्यांच्या निरोगी जीवनासाठी आवश्यक रोगप्रतिकार शक्ती देखीस वाढण्यास मदत मिळते.