कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
आज दि 19 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 514 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 19 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 495 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
अंबाजोगाई 5 आष्टी 2 बीड 9,धारूर 1 माजलगाव 1शिरूर 2 वडवणी 1
सोमवारी आढळलेल्या 1,924 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19,92,683 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 3,854 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 35 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 18,90,323 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 50,473 वर पोहोचला आहे. तर सध्या 50,680 रुग्ण उपचार घेत आहेत.
नवी दिल्ली । देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, गेल्या 24 तासात देशात 10 हजार 64 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 7 महिन्यातील ही सर्वात निचांकी आकडेवारी आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 1.5 कोटी जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1.02 कोटी जण या महामारीपासून बरे झाले आहे. गेल्या 24 तासात देशातील विविध भागात 137 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 1 लाख 52 हजार 556 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात सध्या 2 लाख 528 जणांवर उपचार सुरु असून, 1 कोटी 02 लाख 28 हजार 753 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.