बीड

अंबाजोगाई तालुक्यात लोखंडी सावरगाव येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव:10 गावात अलर्ट जारी


प्रतिबंधित क्षेत्रात कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करणेस प्रतिबंध–जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड, दि. १७::–अंबाजोगाई तालुक्यात लोखंडी सावरगाव येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला असून त्यासह प्रतिबंधित क्षेत्रात निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 (Action Plan for Prevention Control and Containment of AVIAN Influenza (Revised 2021)) नुसार
लोखंडीसावरगांव हा संक्रमित क्षेत्र (Infected Zone) घोषित करण्यात आले असून लोखंडी सावरगाव पासून 1 ते 10 कि.मी.परिसरातील
श्रीपतरायवाडी, वरपगांव, कोळकानडी , डिघोळअंबा, कोद्रीो सातेफळ, हिवराखुर्द,चनई, कुंबेफळ, माकेगांव, उमराई, कानडी बदन तसेच
केज तालुक्यातील होळ, दिपेवडगांव,पळसखेडा, बोरीसावरगांब या गावांतील कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करणेास प्रतिबंध घालण्यास येत आहे. तसेच या बाबींसाठी वरील सर्व गावे ही सतर्क भाग (Surveillance Zone) म्हणून पुढील आदेशापर्यंत घोषीत करण्यात आली आहेत असे निर्देश राहुल रेखावार, जिल्हाधिकारी बीड यांनी दिले आहेत.
यासंदर्भात सामान्य नागरिकांमध्ये कोबीचा मृत्यू बाबत भितीचे वातावरण निर्माण होवू नये आपल्या भागात 1 किंवा २कावळे मृत पावल्यास घाबरून जावू नये. सदरील मृत कावळे /कोंबड्या आढळून आल्यास ग्रामपंचायत नगरपंचायत यांचेशी व नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा. मृत कावळ्यांना हाताने स्पर्श करु नये, मास्क वापरावा. तसेच सदरील
भाग धुण्याच्या सोड्याने किंवा चुण्याने निर्जतूकिकरण करुन घ्यावा. कावळ्यांमध्ये जास्त प्रमाणात असाधारण मृत्यू आढळल्यास रोग निदानासाठी त्यांचे नमुने पाठविण्यात येतील.