करोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना मानाचा मूजरा:लसीकरण क्रांतीकारक पाऊल-मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई – राज्यव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात झाली. आज आपण क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत. या बद्दल कुणाचही दुमत असण्याची शक्यता नाही. जीवाची पर्वा न करता करोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना मी मानाचा मूजरा करतो, असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोविड योद्ध्यांबरोबरच मुंबई महापालिका प्रशासनाचेही अभिनंदन केले.
केंद्र सरकारकडून कोविड लसीकरणाबाबत महत्त्वाच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार करोनाद्ध्यांना सर्वात आधी लस देण्याचे ठरले आहे. नाहीतर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मीच पहिली लस टोचून घेतली असती, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हंटले आहे.