दोन दिवसांनी खेळाडूंसाठी जिल्हा स्टेडियमचे मैदान खुले करण्याचा निर्णय
खेळाडूंच्या मागणीवरून माजीमंत्री क्षीरसागरांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
बीड-गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडियम बंद असून हे मैदान खुले करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र अजूनही त्यावर कारवाई झाली नाही आज अखेर खेळाडूंनी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन क्रीडांगण खुले करण्याचा आग्रह केला मा क्षीरसागर यांनी तातडीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार व क्रीडा अधिकारी विद्यागर यांच्याशी चर्चा केली व मैदान खुले करावे अशी सूचना केली येत्या दोन तीन दिवसात खेळाडूंसाठी हे मैदान खुले करण्याचा निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्हा स्टेडियम चे मैदान बंद करण्यात आले आहे आता जवळपास सर्वच मैदाने खेळाडूंसाठी खुले करण्यात आली आहेत मात्र गेल्या नऊ महिन्यापासून बीड मधील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बंदच आहे ते खुले करण्यात आले नाही
त्यामुळे विविध प्रकारच्या खेळाडूंना सराव करता येत नाही आज बीडमधील मिलन बॉईज फुटबॉल क्लबच्या खेळाडूनी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन मैदान खुले करावे अशी मागणी केली त्यानुसार माजीमंत्री क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि क्रीडा अधिकारी विद्यागर यांच्याशी संपर्क साधून सर्वच खेळाडूंसाठी तातडीने मैदान खुले करावे अशी सूचना केली
जिल्हाधिकारी रेखावार यांनी येत्या दोन ते तीन दिवसात मैदान खुले करण्याचा निर्णय होईल असे सांगितले आहे यावेळी क्लब चे पदाधिकारी सय्यद जफर, साजिद परवेज खान,वैभव मुसळे,अदनान सिद्धीकी आदिल चौंऊस,राहुल बायस, शेख शोएब,आमीर कादरी, अबेद सर,आदि उपस्थित होते