महाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्राला 55 टक्के कमी डोस:हवे होते साडे सतरा लाख मिळाले साडेनऊ लाख

मुंबई – देशभरात करोना लसी पोहचविण्यात येत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात लसी पोहोचण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र महाराष्ट्राला अपेक्षित होत्या त्यापेक्षा कमी लस मिळाल्याचे समोर आले आहे. खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर लसी कमी दिल्याचा आरोप केला आहे.

लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस मिळाले आहेत. केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनंतरच लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. राज्याला बफर स्टॉकसहित सुमारे 17 ते साडेसतरा लाख डोस मिळणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात 9 ते साडेनऊ लाख डोस प्राप्त झाले आहेत.

दरम्यान ज्या व्यक्तीला डोस द्यायचे त्याला पूर्ण डोस द्या.मात्र तब्बल 55 टक्के डोस कमी आले आहेत. आपल्याला आठ लाख लोकांचे लसीकरण करायचे होते. मात्र डोस कमी आल्याने आपल्याला केवळ 5 लाख लोकांना लसीकरण करता येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. आपण आठ लाख लोकांना अपलोड केल्याचे समाधान आहे. मात्र त्याच्या तुलनेत लस कमी आल्या आहेत. जेवढ्या लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्या आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत विभागीय कार्यालयात उपलब्ध होणार असल्याचे टोपेंनी सांगितले.

दरम्यान 16 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशभरात लसीकरणाचे उद्घाटन करणार आहे. महाराष्ट्रात दोन ठिकाणी पंतप्रधान मोदींशी संवाद साधण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.