बीड

बीड जिल्ह्यात आज 54 कोरोना पॉझिटिव्ह:बीडमध्ये 26 ने वाढ

आज दि 13 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 699 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 54 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 645 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

अंबाजोगाई 4 आष्टी 8 बीड 26 गेवराई 3 केज 4 माजलगाव 1 परळी 3 पाटोदा 3 शिरूर 1 वडवणी 1

राज्यात कोरोनाची स्थिती

राज्यातील करोना संसर्ग अद्याप थांबलेला जरी नसला तरी, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्यते वाढ होताना दिसत आहे.काल दिवसभरात राज्यात ३ हजार २८२ जणांना करोनावर मात केली. तर, आतापर्यंत १८ लाख ७१ हजार २७० जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.७ टक्के आहे.


याशिवाय,काल दिवसभरात २ हजार ९३६ नवे करोनाबाधित आढळले असून, ५० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ७४ हजार ४८८ वर पोहचली आहे. सध्या राज्यात ५१ हजार ८९२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, ५० हजार १५१ रुग्णांचा आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे.